तुम्हीच त्यांना काही न काही द्यायचं आहे. कारण त्यांचं लक्ष तुमच्यावर आहे तेही तुमचं घर उंचावर आहे म्हणून
आयुष्य
हे समूहगीतासारखं आहे. समूहगीत गायचं म्हणजे सर्वांना लावता येतील ते सूर
आणि झेपेल ती पट्टी निवडावी लागते. एकट्याने गायचं तेंव्हा आपल्याला हवा तो
सूर आपला आहेच. तो कोण हिरावून नेतोय ?मुळातच घर उंचावर बांधलं की गावातली घाण जास्त दिसणारच. पण इतरांपेक्षा आकाशही जास्त दिसतं. उगवणारा व मावळणारा सूर्य आपल्या साक्षीने उगवतो , मावळतो . रातराणीचा सुगंध आपल्याला जास्त येतो .
तुमच्या सारख्या माणसांनी हे लक्षात ठेवणं जरुरीचं आहे की लोक तुमचं देणं लागत नाहीत. कारण तुमच्या मागण्या पूर्ण करण्याची त्यांची हिंमत नाही. त्यांना इच्छा नाही असं मी म्हणत नाही . हिंमत नाही.
तुम्हीच त्यांना काही न काही द्यायचं आहे. कारण त्यांचं लक्ष तुमच्यावर आहे तेही तुमचं घर उंचावर आहे म्हणून.
0 comments:
Post a Comment