काही न काही छंद हवा - व पू काळे Va Pu kale


माणसाला  काही  न  काही  छंद  हवा . स्वप्न  हवीत . पुरी  होणारी  किंवा कायम  अपुरी  राहणारी . त्यातून  तो  स्वताला

हरवायला  शिकतो , सापडायला  शिकतो.

हे  हरवणं  सापडणं  प्रत्येकाचं  निराळा  असतं .  पती पत्नीचं  एकंच  एक मत  असलं

तर  संसारात  स्वर्ग  निर्माण  होतो . पती पत्नीचा  ह्या  हरवण्या-सापडण्याचा जागा  एकंच  निघाल्या  तर  ते  सुखदुखाचे  समान वाटेकरी  होतील .

दोघांचा  अशा  जागा  किंवा  स्वप्न  वेगवेगळी  असतील  तर  ते  प्रकृती धर्मानुसार  स्वाभाविक  आहे.

पण  तो  एकमेकांचा  टिंगलीचा  विषय  होऊ  नये , इतपत  भान  संसारात ज्यांना  टिकवता  येईल  त्यांना  संसार  सुखाचं  मर्म सापडेल . ज्यांना  हे असं  हरवता  येत  नाही  , ते  रिकाम्या  वेळेचे  बळी  होतात.




0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author