"नक्षत्रांचं देणं" - व पू काळे Va Pu kale


"नक्षत्रांचं देणं"
नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात .आपल्यावर त्याचं छात आहे ह्या आनंदात विहार करायचा असतो .

आनंद ,समाधान, तृप्ती कृतज्ञ भाव ,स्नेह ह्या भावनांना तराजू असते तर एव्हाना हे सगळे  काळ्या बाजारात गेले असते .

त्याचं स्मगलिंग झालं असतं,इतकंच कशाला ,त्याच्यावर इन्कम  š@क्स हि बसला  असता.मग एकही माणूस साध हसलाही नसता . आनंदाच्या उकळ्या दाबून माणसं फुटली असती .

तेंव्हा "नक्षत्रांचं देणं" कधीच चुकवता येत नाही .ह्यातच त्यांची उंची .तिथ हात पोहचू नयेतच.कारण आम्ही माणसांनी जिथ जिथ आमचे  हात पोहचवले तिथ तिथ स्वताचे शिक्के उमटवले .त्या पेक्षा अशाच काही अलौकिक चांदण्या ,तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात तिथं माथा झुकवावा .पण आम्हाला ' सितारे 'ओळखायला येतात ,तारे येत नाहीत .हे दोन्ही ओळखणं खर तर सोपं आहे . डोळे उघडे ठेवल्या शिवाय जे दिसत नाहीत ते ' सितारे ' जे मिटल्यावर दिसतात ते ' तारे '....

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author