श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो.
एकूण
एक ग्रंथांना मागे सारील असा एक प्रचंड ग्रंथ प्रत्येक जण स्वत:बरोबर
आणतो. तो ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा ग्रंथ. पृष्ठसंख्या किती हे
न सांगणारा ग्रंथ. ह्या ग्रंथातला मजकूर फक्त उलटलेल्या पानावरच उमटलेला
असतो. श्वासाश्वासागणिक एकेक शब्द इथं छापला जातो. इथे प्रत्येक शब्द हा
फक्त प्रुफच. प्रुफरीडिंग नाही. खोडरबर न वापरता लिहिला जाणारा हा एकमेव
ग्रंथ. ' चुकीची दुरुस्ती ' किंवा ' शुद्धिपत्रक ' कोणत्या पानावर टाकायचं
ते ग्रंथ कर्त्यालाच माहीत नसतं. अनेक चुका जगजाहीर होतात. अनेक लादल्या
जातात.असंख्य चुका केवळ पुस्तकाच्या मालकालाच वाचता येतात. किंबहुना ह्या
एकमेव स्वयंभू ग्रंथामध्ये हीच एकुलती एक सावली आहे , कि ज्यातली असंख्य
पानं कुणालाही वाचता येत नाहीत.
अशाच अनेक पुस्तकांसमोर मीही एक पुस्तक म्हणून उभा असतो. श्रोत्यांनी त्यांच्या ग्रंथातल्या लपवलेल्या पानांसमोर मी माझी लपवलेली पानं उघडतो. जिथं मजकूर जुळतो तिथं प्रतिसाद मिळतो.
क्वचित केव्हा केव्हा आपण आपण आपल्या उलटलेल्या पानांवर हा मजकूर का लिहला
नाही ? --- अशी खंतही काही काही पुस्तकांच्या मुखपृष्टावर दिसते.
इन्कमटॅक्स ऑफिसर
समोर बँकांची पासबुकं उघडी करून दाखवावीच लागतात. तशी काही प्रांजळ माणसं ,
सक्ती न करताही त्यांची पुस्तकं तुमच्यापुढे उघडतात. शुभलाभ आणि स्वस्तिक
काढून दोन दोन चोपड्या ठेवणारे महाभाग वेगळे. त्यांनी तर देशाच्या
ग्रंथातली पुढची पानंसुद्धा , सत्ताधाऱ्यांना खळ लावून , बरबटून टाकली
आहेत. पण जिथे संवाद जुळतो तिथे तुमचं आमचं , म्हणजेच श्रोत्यांचं आणि माझं
पुस्तक वेगवेगळं राहत नाही. एकाच आवृत्तीतली एक प्रत , उरलेल्या प्रतींशी
बोलत राहते.
0 comments:
Post a Comment