कुणाला विकले गेलो ? - व पू काळे Va Pu kale


आम्ही इतके कुणाला विकले गेलो ? का गेलो ?
 
काही मोजकी घरं वगळली तर विवाहसोहळ्यानिमित्त दरवाज्यावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तूला विसंवादाची वाळवी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय.इतक्या झपाट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं ?

एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या , रंगाच्या , माध्यमांच्या कलापूर्ण मंगल पत्रिका छापल्या जाताहेत . प्रत्येक मंगलपत्रिकेगणिक गणपतीबाप्पा नावीन्यपूर्ण फॉर्म मध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतानी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्यापेक्षा आपण जास्त लवचिक आहोत हे सिद्ध केलं. 

प्रत्यक्ष विवाहसोहळ्यात तर पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींपेक्षा जास्त महत्व व्हिडीओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंस्काराच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धिवान समजला जाणारा आपला समाज , यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय त्याचं हे विदारक उदाहरण. खरंतर सगळ्या मंगलकार्यावर '' थीएटर्स " चे फलक लावावेत .

' श्रुती मंगल थीएटर ', 'आनंद थीएटर ' असं म्हणावं . स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटणच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायचं कौशल्य , अर्पणभाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो.

आम्ही इतके कुणाला विकले गेलो ? का गेलो ?

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author