१९० | वपुर्झा
'जबाबदारी झटकण्याचा मार्ग सापडला म्हणजे पुरूष सुखी होतात.'
मी निर्भीदपणे विचारलं, 'पुरूष म्हणूनच ज्या गरजा असतात त्याचं काय?'
'ड्राफ्ट काढण्याकरिता ज्या वेळी घरी जाते त्या वेळेला जकात भरली म्हणजे झालं.'
'यू आर व्हेरी ब्लंट.'
'तसं
व्हावं लागलं. पत्नीला स्पर्श कारताक्षणी तिला 'कात' टाकायला लावण्याचं
समर्थ्या नवर्याजावळ नसेल तर ती 'जकात'च. मन, भावना, जिव्हाळा, आपुलकी ह्या
स्त्रीच्या प्राथमिक गरजा आहेत. मी स्त्रीधर्माची प्रतिनिधी आहे.
नवर्याकडून ह्या गोष्टी मिळणार नाहीत, हे मला लवकर समजलं. पुरुषचा 'नवरा'
फार पटकन होतो. नवर्याचा 'पती' होणं हे एखाद्याचं घरात घडतं. माझ्या संसारात
मी एक वस्तू आहे. वापरली जाणारी. हे ज्या क्षणी ध्यानामध्ये आलं त्या क्षणी
मन मुलकरता ठेवलं आणि शरीर नवर्याकरता.'
0 comments:
Post a Comment