माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा .तिथं सगळं अमाप आहे,विराट आहे,प्रचंड आहे.इथं लहान काहीच नाही.
एक माणूस पहा ! केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे !
पर्वतराशी जेवढ्या प्रचंड,समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गूढ तसाच माणूस -प्रत्येक माणूस -- प्रचंड , अमर्याद आणि गुढही.
माणसाला बहाल केलेली पन्चेइन्द्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया,नादाची दुनिया स्पर्शाची दुनिया.
सगळं
विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं कि ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं
तो त्या विराट जीवनाचं रोपटं जीवनापेक्षा लहान गोष्टीने करणार नाही.
"माझी श्रद्धा आहे, की परमेश्वरानं निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे,जीवनापेक्षा लोभस असणार."
0 comments:
Post a Comment