प्रेम - व पू काळे Va Pu kale


प्रेम
प्रेमाची खरी व्याख्या कुणाला समजलीय !अरे प्रेम म्हणजे महापूर असतो महापूरअसं झूळझूळ वाहणारं एखाद पाणी…येतय येत नाही… येतय येत नाहीप्रेम म्हणजे वादळ आहे…प्रेम म्हणजे महापूर आहे…पण समाज आणि प्रेमाची ही संकल्पना यात हे जे अंतर पडलंय त्याचे कारण माहीत आहेप्रेमाचा स्वीकार करताना देखिल ते जर तुमच्या रुढ चाकोरीतून.. मान्यवर नात्यातूनच आलं तर त्याला तूम्ही प्रेम म्हणणारमग ते गढूळ असलं तरी तुमच्या हिशिबी ते पवित्रत्यात झेप नसली उत्कटता नसली तरी त्याला तुम्ही कवटाऴणारत्यात तेज नसलं तरी तुम्ही दिपून जाणारअरे त्या प्रेमात पेटवून टाकण्याची ताकद नसली तरी तुम्ही जऴून स्वत:ची राख होउन देणारका… कारण ते चाकोरीतुन येतंतुमच्या नीती अनीतीच्या कल्पनांची बूज संभाळत येतंबस तुमच्या सारख्यांना तेवढच प्रेम समजतंसमाजालाही तेवढच प्रेम कऴतंबाकीच्या प्रेमाला मग समाज काय म्हणणारकुठेही काहीही कमी नसताना माणसं दु:खी दिसतात ते यामुऴेउत्कट प्रेम करणारी व्यक्ती त्यांना आयूष्यात भेटतच नाहीयदा कदाचीत भेटली तरी त्या प्रेमाला कधीही प्रतिष्ठा मिऴत नाहीआणि तरीही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं एखादं प्रेमाच स्थान हवंच असतंकाय कारण असेलएकच………अशा तर्हेचं प्रेम भक्ती जिथं उगम पावते तिथं संकेत नसतात असते फक्त उत्कटतातिथे बंधन नसतं असते फक्त अमर्यादतात्यातली दाहकता पचवायला पोलादी छाती लागतेत्यातून जे नंदनवन फूलतं ते पहायला दोन डोऴे पुरत नाहीअरे डोऴे पाहू शकणार नाहीत असं दाखवणारं निराऴं इन्द्रिय लागतंसामान्यांच्या वाटणीला हे प्रेम यायचं नाहीनिभावण्याची ताकद असणार्या माणसांचाच तो प्रांत आहेआणि प्रेमाच्या प्रांतात अशी उत्कटतेने उडी घ्यालमागचा पुढचा विचार न करताना धाव घ्याल तेव्हाच तुम्हाला भक्ती म्हणजे काय ते समजेल…..


0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author