६६ | वपुर्झा
कलाकाराची बायको होणं हे जसं सतीचं वाण, तसंच कलाकाराची मैत्रीण आणि नुसतं प्रेयसी म्हणून राहणं हेही सतीचंच वाण असतं.मैत्री हि केवळ मैत्री राहत नाही. प्रियकराच उत्कर्ष होत चालला की मन आवरत नाही. धरबंद राहत नाही. प्रियकराची, त्या कलाकाराची उत्कटतेची भूक, साठीच्या व्याधीप्रमाणे आपल्यालाही घेरून टाकते. असे दोन उत्कट जीव एकत्र आले की उत्कटतेचं शेवटचं टोक गाठायला त्यांना वेळ लागेल का?
उत्कटतेतही जोपर्यंत बुद्धी जागृत आहे तोवर उत्कटता हे वरदान आहे. एरवी ती शाप आहे. शाप हा भोगूनच पार करावा लागतो. पराशराला साडेसातीचा शाप होता. तो क्षणमात्र का होईना चळला, त्यातून महाभारत निर्माण झालं. म्हणून म्हणालो की, कलाकाराची प्रेयसी राहणं- आणि त्याला मर्यादेत थांबवणं हेही सतीचा वाण आहे. त्याला हि ताकद हवी. कलाकाराची पत्नी त्यागी हवी, तशीच त्याची प्रेयसी पण त्यागी हवी. तसं नसेल तर कलाकाराचा विदूषक होतो.
0 comments:
Post a Comment