वपुर्झा | ४५
सल्ला मागणारे खूप असतात. ऐकणारे किती असतात ? शेवटी स्वतःला जे हवं असतं तेच माणूस करतो. आपण मात्र जीव तोडून, आपणच प्रसंगात सापडलो आहोत असं समजून घसा कोरडा करतो. सांगणाऱ्या माणसांना, कुणातरी ऐकतोय आणि त्याला आपलीच बाजू योग्य वाटत आहे, एवढंच समाधान हवं असतं. त्यांना पुन्हा जगावंसं वाटतं. आपला काहीच चुकलेलं नाही ही भावनाच नव्या क्षणाचं स्वागत करायला बळ देते.
0 comments:
Post a Comment