व पू अन प्लेझर बोक्स


दुपारचे बरोबर दिड वाजलेले. उन्हाळ्याचे दिवस. नुकतचं आंघोळ करून मेस मधून जेवण करून आलेलो. जिना चढल्याने माझ्यासोबत सगळ्यांनाच धाप लागलेली. जेवणही full झालेलं. डोळ्यात सुस्ती होती. पलंगावर बसलो. आणि हातात आलं वपुंच "प्लेझर बोक्स." पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हाच ठरवलं मस्त वाचत वाचत लागणार्‍या सुखद झोपेचा आनंद घ्यायचा.. अवस्थाच तशी होती आणि परिणामी
क्रुतीही.. बसून वाचत असणारा मी केव्हा एकदा पलंगावर लवंडलो ते मला माझच कळालं नाही..तेवढ्यात एक ओळ वाचण्यात आली. "अंत आणि एकांत यात माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. म्हणून महापालिकेतील 27 वर्षांच्या नौकरीत माणूस जोडण्याच काम मी केलं. केवळ त्या एकांताच्या भितीने.." हे वपु पण असं मधेच एखाद वाक्य टाकतात.त्याच्या आधीची 4-5 वाक्ये हमखास डोक्यावरुन गेलेली असतात.. पण त्या एका वाक्याने वळण लागतं..त्या विचारांना आणि सुरू होतो त्यांचाच खेळ..एकीकडे वाचन आणि एकीकडे तो खेळ... प्लेझर बोक्स मधे त्यांनी एक अनुभव दिलाय.जो मनाला खूप भावला..
"
एका पुस्तकाच्या प्रकाशना संबंधी त्यांनी लतादिदिंना एक पत्र पाठविले.  अर्थात ते पुस्तक त्यांनाच अर्पण होत.  तसा वपुंचा आणि मंगेशकर कुटुंबीयांचा जुनाच संबंध. ह्रदयनाथ मंगेशकरांच्या अनेक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनीच केलेले..परंतु लतादिदिंना पाठवलेल्या त्या पत्राचं त्यांना ना काही उत्तर आलं ना लतादिदिंनी त्या पत्राचा काही पाठपुरावा केला..त्यावेळी त्यांच्या ज्या भावना होत्या,त्यांना जे feel झालं ते 
निराळचं होत. एखाद्याला इतक्या आतुरतेने पाठवलेल्या पत्राच्या उत्तराची जेव्हा आपण अपेक्षा करतो आणि त्या पत्राच उत्तर येत नाही तेव्हा मनातल्या भावनांचा खेळ ज्याचा त्यालाच कळतो.आणि त्या वेळेस वपुंना वाटलं ' जे पत्र न चुकता रोज माझ्या दारासमोर रांगोळी काढतात, काही नावासहीत तर काही अनामिक.. अशा पत्र पाठवनार्यांना कसं वाटत असेल..ज्यांना त्या पत्राचं उत्तर नाही भेटतं..' म्हणून त्या दिवशीच त्यांनी ठरवून टाकलं की येणार्या प्रत्येक पत्राला छोटं का होइना उत्तर पाठवायचं.. आणि त्या letter box मधून आलेल्या पत्रांना उत्तर देताना एखाद्याचं मन राखल्याचा जो आनंद त्यांना मिळत 
होता त्यातुनच आणि त्याच letter box च्या पत्रांच्या देवाणघेवाणीतून साकारलेलं पुस्तक म्हणजे 'प्लेझर बोक्स.' ..."
ते पुस्तक वाचता वाचतानाच माझ्या बसण्याच्या अवस्था बदलत होत्या.. आणि एका क्षणी मलाच झोप कधी लागली ते कळालं नाही.. दुपारच्या झोपेत स्वप्न पडणं जरा अजबच..पण मला पडतात...आणि 
आजही पडलं... "मला माझ्या रोजच्या जीवनात येणार्या अडचणी,माझ्या मनात येणारे विचार आणि अनेक अशा गोष्टी मी सांगत होतो..वपुंनाच.. त्यांचेही उत्तरे येत असत..कदाचित माझी अपेक्षा असल्यानेच... एका पत्रामधे मी वपुंना त्यांचा मोबाइल नंबर मागितला...आणि बेझिजक त्यांनी दिलाही..पत्रातील गप्पांच्या त्या ओढीला मला प्रत्यक्ष अनुभवायच होत..प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात ते माझ्याशी बोलताना मला ऐकायचं होत..त्यांच्या या पत्रातील 'दोस्ताला' त्यांच्याशी हितगुज करायच होत.. मित्रांना मी मोबाइल मधील त्यांच नाव अभिमानाने दाखवत असे..पण माझी हिम्मत त्यांना फोन करण्याची कधीच झाली नाही.. एके दिवशी बळ एकवटुन,त्यांच्याशी बोलायच ठरवुन मी त्यांच्या मोबाइल मधील नावावर गेलो..त्यांच्या नावावर click केलं आणि बघितल तर नंबर नव्हताच..एखाद्या भयावह स्वप्नातुन जागा झाल्यासारखा मी झोपेतुन जागा झालो.. चेहरा घामाने भिजला होता..शर्ट ओला झाला होता.. मी नकळत मोबाइल हातात घेतला आणि वपुंच नाव मोबाइल मधे शोधु लागलो... तेवढ्यात वास्तवाच भान मला आलं..तो क्षणच असा होता की शब्द 
अपुरे पडत होते..तो क्षणच असा होता की एका न पाहिलेल्या व्यक्तिसाठी डोळ्यांत आसवे आली होती.. त्यांच्या भेटीसाठी मन अधीर झालं होत.. पण वास्तवातील सत्य ना त्या आसवांना रोखु शकलं ना त्यांच्या आठवणीतुन मला बाहेर काढु शकलं..कारण वपुंना भेटण्याचा,बोलण्याचा दैवयोग माझ्या मोबाइल मधुनच नव्हे तर आयुष्यातुनच गेला होता...

वपु खास तुमच्यासाठी...

वाढदिवसाच्या मन:पुर्वक 
शुभेच्छा...

By-मकरंद आयचित

0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author