दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत.
स्वतःचा, स्वतःच्या कुटूंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी...अशी ही माणसे आहेत.
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदुःखे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूला आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात
छोट्याश्या कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.
या संग्रहातील कथा
- स्पर्शज्ञान
- ओळखीचा
- मस्तानी
- मेकॅनो
- स्त्रीहट्ट
- श्रीमंत
- दुरुस्ती
- सापळा
- बस चुकली
- एक सिंगल चहा
- प्रपोजल
- टॅक्सी ड्रायव्हरची बायको
- पण माझ्या हातांनी
- बेटा, मी ऐकतो आहे!
- कपाट!
- अपघात
- आश्चर्याचा दिवस
- स्प्रिंग
- लग्नाचा पहिला वाढदिवस
- तेथे पाहिजे जातीचे
- दोस्त
0 comments:
Post a Comment