आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून
देणारे कथाकार वपु काळे यांना, ब्रेन ट्यूमरने मृत्यु पावलेल्या आपल्या
प्रिय पत्नीच्या दुराव्यानंतर, अंतर्बाह्य उन्मळत असल्याचा प्रत्यय आला.
आपण संभ्रमात, विषादावस्थैत सापडलो आहोत असे वाटले
त्या मनःस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना एका मित्राने ओशो रजनीश यांच्या गीतेवरील प्रवचनांच्या कॅसेटस् भेट देऊन, त्या ऐकण्यास सांगितले. आणि आश्चर्य हे की त्या ऐकून वपुंना जगण्याचे नवे बळ मिळाले. भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नसून तो मानसशास्त्रावरचा पहिला जागतिक ग्रंथ आहे हे त्यांना उमगले. आपण स्वतःच अर्जुन आहोत, आणि स्वतःच नव्हे तर प्रत्येक माणूस हा अर्जुन आहे, आणि त्याला अर्जुनाप्रमाणेच आपण पदोपदी कोंडीत सापडल्याची, गोंधळल्याची, संभ्रमाची जाणीव होते, असेही त्यांना कळून चुकले.
महाभारताला शेवट नाही, फक्त सुरुवात आहे. अशीही एक कल्पना वपु भारावून मांडतात. ओशो रजनीशांच्या कॅसेटस् नी आपल्याला श्रीकृष्ण उलगडून दाखवला, महाभारताचा वेगळा अर्थ सांगितला, माणूस कळायला एक नवा डोळा दिला असे म्हणून वपु “आपण सारे अर्जुन” या लेखमालेच्या रूपाने स्वैर व स्वच्छंद चिंतन मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील पहिल्या १९ लेखांचा हा संग्रह.
आभार : विकिपीडिया

0 comments:
Post a Comment